अंगणात खेळत असलेल्या बालिकेला बसची धडक :  लोहार्‍यातील घटना

A two-year-old girl was injured in a collision with a speeding bus in Lohara रावेर : अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय बालिकेला भरधाव बसने धडक दिल्याने बालिका जखमी झाल्याची घटना तालुक्यातील लोहारा येथे शुक्रवार, १८ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बस चालकाविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रस्त्यावर खेळणार्‍या बालिकेला भरधाव बसची धडक
अल्पीया अरमान तडवी (वय २, लोहारा) असे जखमी महिलेचे नाव आहे. जाहबीर शब्बीर तडवी (२३, लोहारा) यांच्या तक्रारीनुसार, कुसुंबा-लोहारा रस्त्यावर लहान मुले खेळत असताना संशयीत आरोपी तथा बस चालक भीमराज पुंडलिक शंखपाळ (५८, यावल) याने बस (एम.एच.४० एन.९०८४) भरधाव व हलगर्जीपणाने चालवत अल्पीया या बालिकेला धडक दिल्याने बालिका जखमी झाली. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तपास नाईक देवेंद्र पाटील करीत आहेत.