नवी दिल्ली – भारतातील पहिल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेस यजमानांच्या ब्राँझपदकाने सुरवात झाली होती. स्पर्धेची सांगताही भारताच्याच ब्राँझपदकाने झाली. पूजा घाटकरने पहिल्या दिवशी दहा मीटर एअर रायफल स्पर्धेतील ब्राँझपदक पटकावले होते. अखेरच्या दिवशी अंगद वीरसिंग बाजवा याने मिश्र स्कीट स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले; मात्र या प्रकाराला अजून मान्यता नसल्यामुळे या पदकाची अधिकृत नोंद झाली नाही. नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील या स्पर्धेत अंगद हा अमेरिकेच्या हॅली दुन हिच्यासह सहभागी झाला होता.
स्पर्धा फक्त चाचणीसाठी असल्यामुळे दर्जा नाही
ब्राँझपदकाच्या लढतीत रॉबर्ट जॉन्सन आणि कॅटलिन कॉनर यांना २८-२६ असे पराजित केले. हेडन स्टुअर्ट आणि किम्बर्ली ऱ्होड या स्कीटमधील दिग्गजांनी एकमेकांच्या साथीत खेळत बाजी मारली. भारताचे मिश्र प्रकारातील हे दुसरे पदक ठरले. जितू राय आणि हीना सिद्धूने हा पराक्रम केला होता. ही स्पर्धा वेगळ्या प्रकारची होती तसेच ती प्रथमच घेण्यात आली. या प्रकारात दोन वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंना जोडी बनवण्याची संधी मिळाली. मात्र ही स्पर्धा फक्त चाचणीसाठी असल्यामुळे तिला अधिकृत विश्वचषक स्पर्धेचा दर्जा देण्यात आला नाही. हेडन स्टीवर्ट व तीन वेळेचा आॅलिम्पिक पदकविजेता नेमबाज किम्बर्ले रोडे यांनी अर्जेंटिनाच्या फेडरिको व मोलिसा गिल यांना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. बाजवा आणि डून यांनी रॉबर्ट जॉन्सन व कॅटलिन कोनोर जोडीला २८-२६ असे पराभूत केले. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदकासह पाच पदके पटकावली आहेत.