अंगारकीनिमित्त दर्शनासाठी गर्दी

0

मोरया गोसावी मंदिर व परिसर भाविकांनी फुलला

पिंपरी-चिंचवड : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त चिंचवड गावात भाविकांनी महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे पाचपासून भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. त्या वेळी भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर अंगारकीनिमित्त्त भरणार्या बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
चिंचवड येथील गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पहाटे अभिषेक व पूजेनंतर मंगलमूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यांनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. या वेळी दूरवरून आलेल्या भाविकांनीही शांततेत दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने दर्शनास येणार्या भाविकांना विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; तसेच गर्दीमुळे वाहतुकीचा मार्गही बदलण्यात आला होता. या वेळी भाविकांनी केलेल्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता.