जळगाव । अंगावर तेल उडाल्याने आसोदारोडवरील 10 वर्षीय बालिका जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रियंका विनोद नन्नवरे असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. असोदा रोड येथील रहिवासी प्रियंका ही बालिका रविवार रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास घरातील भांड्यांच्या रॅकमधून ताट काढत होती. त्यावेळी ताट रॅकमध्ये अडकल्याने तीने ते ओढले त्याच वेळेस ताट तेलाच्या भांडयात पडले आणि भांड्यातील गरम तेल तिच्या चेहर्यावर उडाले. कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तिला लागलीच जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून तिच्यावर जळीत विभागात उपचार सुरू आहे.
14 महिन्यांची बालिका भाजली
जळगाव- सुप्रिम कॉलनीमधील 14 वर्षांची बालिका भाजीच्या गरम भांडयावर पडून भाजली गेल्याची घटना रविवारी घडली. मोहिनी निलेश बेटावदकर ही बालिका रविवार रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास तिची आई स्वयंपाक करत असतांना पाणी मागत होती. त्या दरम्यान, मोहिनी भाजीच्या गरम भांडयावर पडली. यात भांड्यातील गरम तेल मोहिनीच्या चेहर्यावर उडल्याने ती भाजली गेली असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच तिला उपचारार्थ जळीत विभागात हलविण्यात आले आहे.