अंगावर भिंत कोसळल्याने मजुराचा मृत्यू

0

जळगाव । शहरातील जिल्हापेठ परिसरातील भिरुड हॉस्पीटल समोर सुरु असलेल्या बांधकामठिकाणी भिंत पडल्याने स्लॅपखाली दबून मजुराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला.आर.आर.शाळेपासून जवळच असलेल्या भिरुड हॉस्पीटल समोर शिरीष पाटील यांच्या मालकीच्या घराचे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बांधकाम सुरु आहे. याठिकाणी बिल्डर शंभु सोनवणे यांचे मजुर काम करीत होते. याठिकाणी बेसमेंटचा स्लॅप झाल्यानंतर दुसर्या स्लॅपसाठी पाटया ठोकण्यात आल्या होत्या.

भिंत पडताच मजूरांची धावपळ
शेख इस्माईल शेख अजिज वय 38 रा. गेंदालाल मिल हे भिंतीला झिरी मारण्याचे काम सुरु होते. यावेळी अचानक शेजारील भिंत स्लॅपवर पडला. आणि स्लॅपखाली दबून शेख इस्माईल शेख अजिज यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी बांधकाम ठिकाणी काम करीत असलेले चौघे जण या घटनेत बालंबाल बचावले. भिंत पडताच परिसरात धावपळ झाली. परिसरातील नागरिक व मजुर किरण सोनवणे, रोहीदास कोळीतात्काळ शेख इस्माईल अजिज याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉ. प्रविण पाटील यांनी त्याला मयत घोषित केले. दरम्यान मयत शेख इस्माईल शेख अजीज हा युसुफभाई या ठेकेदाराकडे अनेक दिवसांपासून कामाला आहे. दरम्यान तो आज भिंतीला झारी मारण्यासाठी आला होता असेत त्याचा भाऊ इक्बाल याने सांगितले. त्याच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.