अंगावर वीज कोसळल्याने नीमची महिला ठार

0

तरुणी गंभीर भाजली ; अमळनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी

अमळनेर – कपाशी निंदणी करीत असताना अचानक जोरदार मेघ गर्जनेसह पाऊस सुरू असतानाच वीज कोसळल्याने निम येथील महिला जागीच ठार झाली आहे तर मुलगी गंभीर जखमी झालाची घटना बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास निम येथील कपिलेश्वर मंदिर शिवारात घडली. बुधवारी गुलाब हिरामण चौधरी यांच्या शेतात त्यांचे कुटुंबीय व मजूर गेले असता दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी शेतातील काम करणारे मजूर व मयत ललिता रवींद्र भिल (28) व जखमी नेहा गुलाब चौधरी (22) हे चिंचेच्या झाडाखाली आश्रयाला गेले. यावेळी अचानक कोसळलेल्या विजेने ललिता रवींद्र भील ही जागीच ठार झाली तर नेहा ही गंभीर जखमी झाली. विजेच्या झटक्यामुळे ती चालू शकत नाही, अशी स्थिती आहे. ही माहिती मिळताच गावातील डॉ.नवल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर जखमी नेहावर डॉ.प्रकाश ताडे यांनी उपचार सुरू केले आहेत.