अंघोळीच्याही योग्य नाही गंगा नदीचे पाणी!

0

देहरादून। गंगेत अंघोळ करावी, अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. ती केल्याने तुमचे पाप धुतले जाते, असा समज आहे. ते खरे की खोटे हे सांगणे कठीण आहे, पण, या पाण्यामुळे तुम्ही आजारी पडाल एवढे मात्र नक्की. हरिद्वारला गेल्यानंतर गंगेत डुबकी मारल्यानंतर कदातिच तुम्हाला चांगले वाटेल. मात्र, हे पाणी इतके प्रदूषित आहे की, प्यायचे सोडा, साधे अंघोळीच्याही योग्य नाही आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितले आहे की, हरिद्वारमध्ये गंगेचे पाणी अंघोळीसाठीही योग्य नाही.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार गंगेचे पाणी सर्व दृष्टीने असुरक्षित आहे. अधिकृत आकडेवारीनुार हरिद्वार किनारी असलेल्या 20 घाटांवर रोज तब्बल 50 हजार ते एक लाख भक्त गंगेत डुबकी घेत स्नान करीत असतात. उत्तराखंडमधील गंगोत्रीपासून ते हरिद्वारपर्यंत 11 ठिकाणी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. 294 किमी परिसरातील 11 ठिकाणांची यासाठी निवड करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी चार प्रमुख गोष्टींकडे लक्ष देण्यात आले. आता मात्र पुन्हा गंगामाई वादात सापडली आहे.

कॉलिफॉर्मचे प्रमाणदेखील जास्त आढळले
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांनुसार अंघोळीच्या एक लीटर पाण्यात इजऊ ची क्षमात किमान 3 मिलीग्रामपेक्षा कमी असली पाहिजे. मात्र, इथे हा स्तर 6.4 मिलीग्राम आहे. अनेक ठिकाणी कॉलिफॉर्मचं प्रमाणदेखील जास्त आढळले आहे. जिथे पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 90 एमपीएन (मोस्ट प्रॉबेबल नंबर) असणे अपेक्षित आहे, तिथे हे प्रमाण 1,600 एमपीएन आढळले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार आंघोळीच्या 100 मिमी पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 500 एमपीएनपेक्षा कमी असले पाहिजे.

विषारी घटक आढळले
तापमान, पाण्यात मिसळलेला ऑक्सिजन, बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (इजऊ) आणि कॉलिफॉर्म (बॅक्टेरिया) यांचा समावेश होता. हरिद्वारजवळील गंगेच्या पाण्यात इजऊ, कॉलिफॉर्म आणि काही विषारी घटक आढळले आहेत.