चिंचवड : राहत्या घराच्या इमारतीच्या वाहनतळात पार्क केलेल्या तीन दुचाकी अज्ञातांनी विनाकारण जाळल्या आहेत. यामध्ये एकूण अंदाजे 88 हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. याप्रकरणी सुमन गायकवाड (वय 40, रा. अंजठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सुमन गायकवाड यांनी त्यांची दुचाकी, तसेच लता खरचणे यांनी त्यांची ड्रिम योगा गाडी, एक सायकल, भाऊसाहेब ठोसर यांनी हिरो होंडा दुचाकी मंगळवारी इमारतीच्या वाहनतळामध्ये पार्क केली होती. पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी इमारतीमधील दुचाकी जाळल्या. यामध्ये गाड्यांचे अंदाजे 88 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. निगडी ठाण्याचे फौजदार एस.एस.सुर्यवंशी तपास करत आहेत.