अंजनच्या पाल्याची अवैध वाहतूक, एकास अटक

0
रावेर – अंजनाच्या पाल्याची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या संशयीत इसमास वनविभागाच्या पथकाने अटक केली. संशयीताची न्यायालयाने पंधरा 15 हजारांच्या जामिनावर सुटका केली. 20 रोजी वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे, वनपाल बी.टी.तायडे, आगार रक्षक विकास सोनवणे हे शासकीय वाहनाने रावेर रसलपूर रस्त्यावर गस्त घालत असताना दुचाकी (एम.एच.19 एन. 6847) वरून संशयीत आरोपी अंजनाच्या पाल्याची अवैधरित्या वाहतूक करीत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले.
रावेर न्यायालयात आरोपीस हजर केले असता 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यास जामीन देऊन सुटका करण्यात आली.  पुढील आदेश येईपर्यंत हे वाहन वनविभागाकडे जमा राहणार आहे. सरकारतर्फे अ‍ॅड.वारूळे यांनी बाजू मांडली.