माजी मंत्री खडसे बदनामी प्रकरण ; अनुपस्थितीचा अर्ज मंजूर
रावेर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह पक्षाची बदनामी केल्याच्या खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया गैरहजर राहिल्याने रावेर न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध 8 फेब्रुवारी रोजी अटक वॉरंट बजावले होते मात्र फुफ्फुसातील व स्तनातील कर्करोगाची मोठी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना रावेर न्यायालयात उपस्थित राहणे शक्य नसल्याची बाजू त्यांच्या वकिलांनी मांडल्यानंतर हे वॉरंट मागे घेण्यात आल्यानंतर 7 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार होती मात्र या दिवशीही मुलगी जान्हवीच्या लग्नाच्या स्वागत समारंभामुळे त्या उपस्थित राहू शकत नसल्याचा युक्तीवाद दमानिया यांच्या वकीलांनी केल्यानंतर 13 एप्रिल ही सुनावणीची तारीख ठेवण्यात आली आहे.