अंजली दमानिया विरोधात पकड वॉरंट

0
माजी मंत्री खडसे बदनामी प्रकरण ; रावेर न्यायालयाचे  सांताक्रूझ पोलिसांना आदेश
रावेर :- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर विविध बेछूट आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी मुंबईस्थित समाजसेविका अंजली दमानिया यांच्या विरोधात रावेर न्यायालयाचे न्या.डी.जी.मालविय यांनी गुरुवारी पकड वॉरंट जारी केले. हे वॉरंट हस्ते पाकिटातून बजावण्यात येणार आहे. त्यामुळे अंजली दमानिया जेथे असतील तेथे त्यांना अटक होवू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर बेछूट आरोप अंजली दमानिया यांनी जळगावात येऊन केले होते. या प्रकरणी भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला (क्रमांक 416) कलम (500 व 501) नुसार भरला आहे. या खटल्याचे रितसर समन्स प्राप्त होवूनही अंजली दमानिया कोर्टात हजर होत नसल्याने गुरुवारी अंजली दमानियांविरोधात न्यायाधिशांनी पकड वॉरंट काढले. या खटल्यात फिर्यादीतर्फे अ‍ॅड.चंद्रजित पाटील व अ‍ॅड.तुषार माळी काम पाहत आहेत.