अंजाळेजवळील नंदग्राम गोधाम केंद्रात चोरीचा प्रयत्न ; एकास अटक, दोघे साथीदार पसार

0

यावल- अंजाळे गावसजवळ नंदग्राम गोधाम तथा कृषी पर्यटन केंद्र असून या केंद्रात बुधवारी मध्यरात्री नंतर गेटवरून उड्या टाकत तीन जणांनी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला या वेळी केंद्रात राहणारे दीपक फकीरा पवार हे जागी झाले तेव्हा चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यात किशोर निवृत्ती सावकारे (रा.अंजाळे) यास पळत असतांना पवार यांनी पकडले व सकाळी यावल पोलिसांच्या ताब्यात दिले तर सावकारे यास पोलिस निरिक्षक डी.के.परदेशी यांनी खाक्या दाखवताच त्याने आपल्या सोबत या केंद्रात रणजीत बाबूलाल भोई व छोटू उर्फ संदीप रमेश सपकाळे (दोघं राहणार अंजाळे) हे आले होते, अशी कबुली दिली. पवार यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात तिघांविरूध्द अनधिकृतपणे चोरीच्या उद्देशाने शिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य दोघे संशयीत पसार असून दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार नागपाल भास्कर, हवालदार अजीज शेख करीत आहेत.