अंजाळेतील तरुणांचा शॉक लागल्याने मृत्यू

0

यावल – तालुक्यातील अंजाळे येथे बोअरवेल चालू करण्यासाठी गेलेल्या 39 वर्षीय विवाहित युवकाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सोमवारी दुपारी दिड वाजता ही घटना उघड झाली. दशरथ देवसिंग मोरे (39) असे मयताचे नाव आहे. दर महिन्याप्रमाने विठल मंदिर, वै.जगन्नाथ महाराज समाधी स्थळावर एकादशीचा कार्यक्रम सुरू असताना पाणी नसल्याने बोअरवेल सुरू करण्यासाठी दशरथ मोरे गेले होते मात्र बराच वेळ झाल्यानंतर ते का परतले नाही? हे पाहण्यासाठी भाविक गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. घरात कर्ता पुरूषाच्या अकाली निधनाने शोककळा पसरली आहे. मयत तरुणाच्या पश्‍चात लहान मुलगा, तीन मुली व पत्नी असा परीवार आहे.