अंजाळेत गावठी हातभट्टीवर छापा ; 19 हजारांचे रसायन नष्ट

0

यावल- तालुक्यातील अंजाळे येथील तापी नदीपात्रात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गावठी हातभट्टीवर छापा टाकून 19 हजार 150 रूपये किंमतीच्या 800 लिटर गावठी दारूसह कच्चे रसायणासह साहित्य उद्ध्वस्त केल्याने अवैध व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार सुरेश महाजन, हवालदार राजेंद्र पाटील, हवालदार संजय सपकाळे, कॉन्स्टेबल योगेश वराडे, कॉन्स्टेबल दर्शन ढाकणे यांच्या पथकाने रविवारी सकाळी छापा टाकत 19 हजार 150 रुपये किंमतीचे 800 लिटर गावठी दारु तसेच कच्चे-पक्के रसायण व हातभट्टीचे साहीत्य नष्ट केले. संशयीत आरोपी डिगंबर विलास सपकाळे यास अटक त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.फौजदार नागपाल भास्कर करीत आहेत.