यावल : तालुक्यातील अंजाळे येथे ध्रुव फिटनेस क्लबचे अज्ञातांनी नुकसान केले असून काही साहित्याचीदेखील चोरी झाली. हा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. बुधवारी साडेपाच वाजता जीम उघडण्यात आल्यानंतर व्यायामशाळेचे शटर उघडे असल्याचे व तोडफोड झाल्याचे निर्दशनास आले.
अंजाळे येथील बस स्थानकाजवळ विविध कार्यकारी सोसायटीच्या इमारतीत ध्रुव फिटनेस क्लब नावाची जिम (व्यायाम शाळा) आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे साडेपाच वाजेला व्यायामशाळा उघण्यासाठी संदीप सोनवणे व तुषार कोळी हे गेले असता त्यांना जिमचे शटर उघडे दिसले व ते आत गेले असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. याबाबत व्यायाम शाळेचे मालक नितीन तायडे यांना माहिती देण्यात आली असून यावल पोलिसात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार अशोक जवरे, भुषण चौहाण आदींनी पाहणी केली.
Next Post