अंजाळे घाटात मेटॅडोअर उलटला

0
चालक व क्लिनर सुदैवाने बचावले
यावल- अंजाळे घाटातील वळणावर टाटा 407 मेटेडोअर उलटल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.  अंजाळे घाटात वळण घेत असतांना बस समोरून आल्याने भुसावळकडून येणारी टाटा 407 (एम.एच.19 जे.73) जागीच पलटी झाली. वाहन पलटल्याने चालक अहमद शाह शब्बीर शाह व एकजण असे दोन्ही पुढील काच फुटून बाहेर फेकले मात्र दोघांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. दरम्यान, पलटली झालेल्या वाहनातील प्लॅस्टीक गोण्या दुसर्‍या वाहनात भरून यावलकडे नेण्यात आल्या.