यावल : शहरातील सोने-चांदीचे व्यापारी जळगावहुन सोने-चांदीचे दागिने घेवुन यावल येत असतांना अंजाळे घाटात तीन दुचाकीवर आलेल्या सहा अज्ञात चोरटयांनी त्यांच्याजवळील पैसे व दागिने असा सुमारे 17 लाखांचा मुद्देमाल लांबवला. यात अज्ञात चोरटयांनी त्यांना जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी, 11 रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
यावल- येथील व्यापारी जळगाव हुन सोने-चांदी चे दागिने घेवून यावल येथे येत असताना अंजाळे घाटात तीन दुचाकीवर आलेल्या सहा अज्ञात चोरटयांनी त्यांच्या जवळील पैसे व दागिने असा सुमारे सात लाखांचा मुद्देमाल लुटून जबर मारहाण केल्याची घटना घटना शनीवारी(दि.११)रात्री ९ वाजता घडली.
यावल येथील सोने-चांदीचे व्यापारी रमेश जाधव ( ५५) हे शनिवारी जळगाव येथे ज्वेलरी घेणे व सोने मोड विकुन यावलला परतत असताना रात्री ९ वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंजाळे घाटात त्यांना तीन दुचाकीवर सहा जणांनी लाठ्या~काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील सोने~चांदी व रोकड असलेली बॅग घेवुन भुसावळकडे पसार झाले. बॅगेत 17 लाखांचा मुद्देमाल होता. जखमी जाधव यांना भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक हीरेसह पथकाने घटनास्थळी भेट दिली.