अंजाळे दरोडा, आरोपींचा कसून शोध सुरू

0
भुसावळातील ‘त्या’ आरोपींनी गुन्हा न केल्याची माहिती
यावल :- अंजाळे घाटात सराफा व्यावसायीक रमेश सदाशिव जाधव यांच्यावर सहा आरोपींनी हल्ला करीत पाच लाख 91 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले होती. संशयावरून भुसावळच्या तिघा आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र या आरोपींनी हा गुन्हा केला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
भुसावळच्या रेहान हूसेन पटेल (19, रा. केंद्रीय विद्यालयाजवळ, भुसावळ) शेख मोहसीन शेख सलीम (19) व शहजाद सईद अहमद (18  दोघे रा.आगवाली चाळ, भुसावळ) या तिघांना सुरुवातीला यावल पोलिसांनी अटक केली होती तर आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.