यावल :- तालुक्यातील अंजाळे येथील दुरध्वनी कार्यालयातील 50 हजार रुपये किमतीचे 43 बॅटरी सेल अज्ञात चोरट्यांनी लांबवली. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान ही चोरी झाली. दुरसंचार विभागाचे कनिष्ठ अधिकारी आर.एस.पाटील यांनी गुरूवारी यावल पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली.
तालुक्यातील अंजाळे येथे असलेल्या दुरध्वणी केंद्रातील 20 एक्साईड कंपनीच्या, 20 एचबीएस कंपनीच्या तर थ्री स्टार प्लस कंपनीया अशा 43 बॅटर्या अज्ञात चोरट्याने लांबवल्या. या काळात कार्यालयास सुटी असल्याने त्यास कुलूप होते मात्र चोरट्यांनी कुलूप-कडी-कायंडा कापून बॅटर्या लंपास केल्या. तपास हवालदार अजीज शेख करीत आहेत.