यावल- तालुक्यातील अंजाळे गावाजवळून वाहत असलेल्या तापी नदी पत्रातील एका डोहामध्ये बुडाल्याने 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शिवराम रतन भिलाला (20, पावरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. यावल पोलिस ठाण्यात धनराज शांताराम सपकाळे (अंजाळे) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शिवराम रतन भिलाला (20, पावरा) या तरुणाचा 25 रोजी सकाळी अकरा वाजेपूर्वी तापी नदीत असलेल्या डोहामध्ये पडल्याने मृत्यू झाला. तपास सहाय्यक फौजदार नागपाल भास्कर हे करीत आहेत.