अंजिठा चौफुलीवर अर्धा तास वाहतुक ठप्प

0

जळगाव । अंजिठा चौफुली येथे सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमाराच अचानक वाहतुक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा महामार्गावर लागल्याच्या दिसून आल्यात. अर्धा ते पाऊन तासाच्या प्रयत्नानंतर चौकात कर्तव्यावर असलेल्या दोन वाहतुक पोलिसांना वाहतुक सुरळीत करण्यात यश आले. अंजिठा चौफुली येथे वाहतुक विस्कळीत होण्याचे नित्याचेच असून देखील त्या ठिकाणी कर्तव्यावर असणार्‍या वाहतुक पोलिसांची संख्या कमी असते. यातच वाहतुक विस्कळीत झाली तर ती सुरळीत करण्यातच कर्मचार्‍यांची दमछाक होत असते.

महामार्गावर लागल्या वाहनांच्या रांगा
राष्ट्रीय व राज्य महामार्ग जोडलेली अंजिठा चौफुली हा मुख्य मार्ग समजला जातो. परंतू या ठिकाणी नेहमीच दिड ते दोन तास वाहतुक ठप्प होण्याचे प्रकारही घडतात. सोमवारी पण तेच झाले. चौफुलीवरील सिग्नल बंद असल्यामुळे चारही बाजूंनी सुसाट वाहने जात असतांना अचानक वाहतुक विस्कळीत झाली. चौफुलीच्या मधो-मध वाहने अडकल्याने वाहने काढण्यास चालकांना अडचणी येत होत्या. महामार्गावर वाहतुक ठप्प झाल्याने चोरही बाजुंना वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. अंजिठा चौफुलीवर कर्तव्यावर असलेले दोन्ही वाहतुक पोलिसांनी अखेर वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतू वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्याने अर्धा ते पाऊन तास कर्मचार्‍यांना वाहतुक सुरळीत करण्यात वेळ वाया गेला. मात्र, अखेर कर्मचार्‍यांना वाहतुक सुरूळीत करण्यात यश आले. अंजिठा चौफुली येथे नेहमीच वाहतुक ठप्प होण्याचे प्रकार घडत असतांना देखील त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने असे प्रसंग घडल्यास त्यांनी चांगलीच दमछाक होत असते.