मुंबई: जानेवारी-फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ‘अंडर १९’ वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी बीसीसआयने आज सोमवारी २ डिसेंबर रोजी भारतीय संघ जाहीर केला आहे. 19 वर्षांखालील या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या या संघात मुंबईच्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान भारतीय संघाने पटकावला आहे. यावेळीही देखील टीम इंडियाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
असा आहे संघ:
प्रियम गर्ग (कर्णधार), धृव चंद जुरेल (उपकर्णधार, विकेट कीपर), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिवांश सक्सेना, शास्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिस्नोयी, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुश्ग्रा, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
या संघात अथर्व अंकोलेकर व यशस्वी जैस्वाल या दोन मुंबईच्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. या संघात स्थान पटकावणारा यशस्वी हा दुसरा मुंबईकर खेळाडू आहेत. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत त्याने विक्रमी खेळी केली होती. मुंबई विरुद्ध झारखंड या सामन्यात यशस्वीने द्विशतक झळकावले होते. यशस्वीचे वय केवळ 17 वर्ष आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा यशस्वी हा सर्वात युवा फलंदाज ठरला होता. या द्विशतकासह त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग, शिखर धवन यांच्या पक्तिंत स्थान पटकावलं होते.