आपल्या सुर्याच्या शेजारीच दूरवर खगोलशास्त्रज्ञांना दोन ग्रह सुर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरताना दिसले आहेत. आनंदाची बाब म्हणजे हे ग्रह पृथ्वीसारखे असून तेथे येथील माणसे वास्तव्य करण्यास जाऊ शकताता.
ताऊ चेती ताऱ्याच्या कडेला दोन पृथ्वीसमान ग्रह आहेत. त्यांचे साधर्म्य वरवरचेच नाही तर त्यांच्यावर जीवनाला पोषक वातावरण असावे, असे वैज्ञानिकांना वाटते. ते म्हणतात तिथपर्यंत पोहोचण्याची मोहिम धोकादायक ठरू शकते. या ग्रहांच्या सभोवतील उपग्रह आणि धुमकेतुंनी बनलेले कडे आहे. याचा अर्थ या पृथ्वींना अवकाशस्थ वस्तुंनी टक्कर दिलेली आहे. पृथ्वीपेक्षा ते दोन ग्रह १.७ पट लहान आहेत. जीवन असलेले सर्वात लहान ग्रह म्हणून त्यांची ओळख आपण सांगू शकतो, असे वैज्ञानिकांना वाटते. या पृथ्वी त्यांच्या सुर्यांभोवती फिरत असताना त्यांच्या सुर्यांकडून आपल्या पृथ्वीवर येणाऱ्या प्रकाशात बदल दिसतो.
हार्टफोर्डशायर विद्यापीठातील डॉ. फेबो फेंग म्हणतात आमचे संशोधन मैलाचा दगड ठरेल. याचे कारण म्हणजे पृथ्वीसारखे जीवनाला पोषक ग्रह आम्हाला दिसले. तेथेही नद्या, समुद्र, डोंगर असू शकतात.
सुर्यासारखा तारा दिसला की वैज्ञानिक त्याला निगडित पृथ्वी शोधू लागतात. तसेही परग्रहांवर मानव असेल का, प्रश्न कित्येक वर्षे सतावत आहे. आताच्या पृथ्वी शोधामुळे मानवाचा नाही तरी परग्रहस्थ जीवनाचा शोध लागलेला आहे, ही समाधानाची बाब आहे.
चीली मधील युरोपियन सदर्न ऑब्झरव्हेटरी आणि हवाईतील केक ऑब्झर्व्हेटरीमध्ये दूरस्थ पृथ्वींवरून येणाऱ्या किरणांची तरंग लांबी मोजून विविध निष्कर्ष काढले जात आहेत. लवकरच ते एस्ट्रोनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत.