अंतर्नादतर्फे 130 विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप

0

फालक विद्यामंदिरात राबवला ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम

भुसावळ- अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम यंदाच्या गणेशोत्सवात राबवला जात आहे. या अंतर्गत गुरुवारी स्वर्गीय सौ. सुशिलाबाई फालक प्राथमिक विद्यामंदिरात 130 विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी अध्यक्षस्थानी होते.

यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून मातोश्री शेवंताबाई सरकाटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा रेल्वे सुरक्षा बलाचे माजी आयुक्त रमेश निनाजी सरकाटे, स्व.पुरुषोत्तमभाऊ फालक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिष फालक, उपाध्यक्ष किरण फालक, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एम.यु.पाटील, नगरसेवक मुकेश पाटील, रोटरीचे माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक हरीष कोल्हे यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे यांनी केले. अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांची उपक्रमाची भूमिका व गरज स्पष्ट केली. सूत्रसंचालन हेमलता चौधरी यांनी केले. मान्यवरांचे आभार समन्वयक अमितकुमार पाटील यांनी मानले. शाळेचे शिक्षक अतुल सोनवणे, समीर तडवी, शिक्षिका मोनिता इखारे, अर्चना पाटील यांचीही उपस्थिती होती.

यांनी घेतले परीश्रम
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर घुले, संजय भटकर, ग.स.चे संचालक योगेश इंगळे, शैलैंद्र महाजन, प्रा. धीरज पाटील, विक्रांत चौधरी, संदीप सपकाळेे, अमित चौधरी, भूषण झोपे, मंगेश भावे, जीवन सपकाळे यांनी सहकार्य केले.

विद्यार्थिनीला घेतले दत्तक
उपेक्षित विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे उद्देशाने रमेश निनाजी सरकाटे यांनी पहिलीची विद्यार्थिनी तब्बसूम तडवी हीला दत्तक घेतले. तिचा शैक्षणिक खर्च करण्याची जबाबदारी उचलत असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात जाहीर केले. अंतर्नादने राबवलेला उपक्रम पथदर्शी आहे. त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे सांगत त्यांनी पहिली ते चौथीच्या वर्गातून वार्षिक परीक्षेत प्रथम येणार्‍या गुणवंतासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली.

प्रेरणा देणारा उपक्रम
गणेशोत्सवात अंतर्नादने राबवलेला ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम प्रेरणा देणारा आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांना खंबीर पाठबळ दिले पाहिजे, अशी अपेक्षा माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दात्यांकडून मिळालेल्या अर्थसहाय्यातून 130 गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पाटी, पेन्सील, खोडरबर, वह्यांचे कव्हर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.