जळगाव । महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी निश्चित करण्यात येणार्या मतदान केंद्रांची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करावी असे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका प्रशासनास प्राप्त झाले आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पायभूत सुविधा देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग आग्रही असून निवडणूक काळात मतदान केंद्रांवर अंध अपंग मतदारांसाठी रॅम्प नसणे, पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधा नसणे अशा बाबी राज्य निवडणुक आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत. जाहीर
हरकतीवर प्रभागनिहार पडताळणी सुरू
येत्या निवडणूकीत निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन आदर्श मतदान केंद्र व्हावा.यासाठी निवडणुक आयोग प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने मतदान केंद्र कशा प्रकारची आहेत. याची पाहणी करण्यासाठी त्रयस्थ संस्थेची निवड करावी, याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले. आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. यानुसार 2 हजार 211 अर्जाद्वारे 56 हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त हरकतीनुसार प्रभागनिहाय पडताळणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. प्रारुप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या हरकतींची पडताळणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार दि.29 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.