अंतुर्ली गावाजवळ टँकरने दिली धडक ; बसचे मोठे नुकसान
मुक्ताईनगर- तालुक्यातील पातोंडीहून अंतुर्लीमार्गे मुक्ताईनगर जाणार्या पातोंडी-मुक्ताईनगर बस (एम.एच.07 सी.7235) ला अंतुर्ली गावाजवळील पुलाजवळ टँकरने दिलेल्या धडकेत एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रवाशांना किरकोळ मार लागला. 1 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा अपधात झाला. बस पातोंडी गावाकडून मुक्ताईनगरकडे जाणार्या अंतुर्ली-मुक्ताईनगर बसला पुलाजवळ टँकर (आर.जे.11 सीबी 0078) ने समोरून जोरदार धडक दिल्याने बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालक तसेच प्रवाशांना किरकोळ मार लागला. चालक गजानन शांताराम देवकर यांच्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.