अंतुर्ली येथे कर्जासोबत 355 सभासदांना वृक्षवाटप

0

पाचोरा। तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे विविध कार्यकारी सोसायटीतर्फे सभासदानां कर्ज वाटप करण्यात आले. कर्ज वाटपासोबतच 355 सभासदांना रोप देण्यात आले.

पर्यावरण संवर्धन व संरक्षांच्या दृष्टीने हा संकल्प करण्यात आला. आमदार तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील यांच्याहस्ते वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच दादाभाऊ, हिशानबी पिंजारी, गणेश पाटील, बिस्मीला पिंजारी, प्रशांत पाटील यांच्यासह बँक कर्मचारी उपस्थित होते.