अंतुर्ली-रंजाने येथे रासेयोचे हिवाळी शिबीर

0

अमळनेर : प्रतापचे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीर अंतुर्ली-रंजाने येथे आज 12 डिसेंबरपासून सुरू झाले असून त्याचे अंतुर्ली रंजाने येथे गावातील माजी सैनिक संतोस पाटील व सुरेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबीराची थिम ‘स्वच्छ भारत अभियान’ अशी असुन शिबीराचा कालावधी 12 ते 18 डिसेंबर 2016 दरम्यान या शिबीरात 125 स्वंचतेवर सहभागी आहेत. या शिबीरात स्वयंसेवक ग्राम स्वच्छता, रस्ता दुरुस्ती, डीजीटल इंडीया, कॅशलेस व्यवहार तसेच इतर सामाजिक विषयावर पथनाट्य सादर करणार आहेत.

मान्यवरांची मोठी उपस्थिती
या शिबीराच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर सरपंच सचिन बाळु पाटील सुभाष पाटील भाईदास पाटील रविंद्र प्रकाश पाटील, भरत पाटील व इतर ग्रामपंचायत सदंस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ पी.बी.भराटे यांनी भुषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.बी.मांटे यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा.योगेश तोरवने यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रा.डी.आर चौधरी, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. नलीनी पाटील, प्रा. अमित पाटील तसेच सिनियर स्वयंसेवक उपस्थित होते.