यावल- तालुक्यातील किनगाव येथून पुरी गोलवाडा (ता.रावेर ) येथे अंत्यविधीसाठी जात असताना सांगवी बुद्रुक गावाजवळ दुचाकी घसरल्याने माय-लेक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. दोघा जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वासुदेव राजाराम तायडे (45) व त्यांची आई गंगाबाई राजाराम तायडे (65, दोन्ही राहणार किनगाव ता. यावल) हे पुरी गोलवाडा (ता. रावेर )येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.झेड 4102) वरून जात असताना सांगवी बुद्रुक गावाजवळ सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांची दुचाकी अचानक रस्त्यावरून घसरली. या अपघातात दोघांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर किनगाव येथे प्राथमिक उपचार करून दोघा जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..