अंत्यसंस्काराला जातांना अपघात; काका-पुतणे ठार !

0

जळगाव: बांभोरी येथे अंत्यसंस्कारासाठी जात असतांना भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात काका व पुतणे जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी जैन कंपनी समोर घडली. महेश पोपट तायडे (३२) आणि पुतण्या जयवंत उर्फ कृष्णा रातीलाल तायडे (१४) असे मयत काका-पुतण्याचे नाव आहे. मयत दोन्ही रा. खडके रवंजा ता. एरंडोल येथील रहिवाशी आहेत. दोन्ही महेशच्या बहीणीचे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. समोरून भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात चारचाकी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले. दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.