अंत्यसंस्काराहून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात ; पाच जण ठार

0

बेळगाव- अंत्यसंस्काराहून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाला, त्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे कुटुंब बेळगावातील होते. कार कालव्यात कोसळल्याने हा अपघात झाला. फकिरप्पा पुजेरी, हनुमंत पुजेरी, लगमण्ण पुजेरी, पारव्वा पुजेरी आणि लक्ष्मी पुजेरी अशी मृतांची नावे आहेत. कारचालक बचावला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

हे कुटुंब गोकाक येथे अंत्यसंस्कारासाठी गेले होते. परतत असताना सौंदत्ती जवळील कडबी गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटले आणि कार कालव्यात जाऊन कोसळली. कारचालक मात्र दरवाजा उघडून पोहेत वरती आल्याने त्याचा जीव वाचला.