अंत्योदय एक्स्प्रेस सुरू झाल्याने समाधान

0

माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह खासदार रक्षा खडसेंचा पाठपुरावा मोलाचा

भुसावळ (प्रतिनिधी)- गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली अंत्योदय एक्स्प्रेस शनिवार, 16 जूनपासून पूर्ववत सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे तसेच खासदार रक्षा खडसे यांनी ही गाडी पूर्ववत सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. अप-डाऊन 22885, 22886 ही अंत्योदय सुपरफास्ट अनारक्षित गाडी सुरू झाल्याने भुसावळसह चाळीसगाव येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.