अंत्योदय लाभार्थी आता प्राधान्य यादीत येणार

0

एक वा दोन सदस्य असलेल्या कुटुंबाला फटका : प्रधान सचिवांचे आदेश

भुसावळ : राज्यात शिधापत्रिकांचे संगणकीकरण सुरू असतानाच एक वा दोन असलेल्या अंत्योदय लाभार्थींचा आता प्राधान्य यादीत समावेश करावा, असे आदेश राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी काढले आहेत. अंत्योदय अन्न योजनेच्या अनेक शिधापत्रिका एक वा दोन व्यक्तींसाठी देण्यात आल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. सर्वसाधारणपणे पाच वा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असलेल्या कुटुंबाचा अंत्योदय योजनेत समावेशही करावा, असेही आदेशात नमूद आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावे, असे 21 सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.