अंत्योदय, हमसफर व हावडा एक्स्प्रेस रद्द

0

दक्षिण रेल्वे विभागात आधुनिकीकरणाची कामे ; भुसावळ विभागातील प्रवाशांची होणार गैरसोय

भुसावळ- दक्षिण पूर्व रेल्वे विभागात आधुनिकिकरण व सुरक्षेबाबत कामे करण्यासाठी भुसावळ विभागाततून धावणार्‍या अंत्योदय, हमसफर व हावडा एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या रद्द झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

या गाड्या झाल्या रद्द
गाडी क्रमांक 22886 टाटानगर ते एलटीटी अंत्योदय एक्सप्रेस ही गाडी टाटानगर येथून 10, 14, 17, 21, 24 व 28 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 22885 एलटीटी ते टाटा अंत्योदय एक्सप्रेस गाडी 12, 16, 19, 23,26 फेब्रुवारी व 2 मार्च रोजी एलटीटीवरून रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक 12870 हावडा-मुंबई सुपर एक्सप्रेस ही गाडी 15 व 22 फेब्रुवारी रोजी हावडा येथून तर गाडी क्रमांक 12869 मुंबई- हावडा सुपर एक्सप्रेस ही मुंबई येथून 17 व 24 फेब्रुवारीसाठी रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक 20822 सांत्रागाछी-पुणे हमसफर एक्सप्रेस 16 व 23 फेब्रुवारी तसेच 2, 9, 16, 23 आणि 30 मार्च या दिवशी सांत्रागाछी येथून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 20821 पुणे- सांत्रागाछी हमसफर एक्सप्रेस पुणे येथून 18 व 25 फेब्रुवारी व 4, 11, 18, 25 मार्च आणि 1 एप्रिल रोजी रद्द राहणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाने कळविले आहे.