अंदमान-निकोबार बेटावर भूकंपाचे धक्के

0

नवी दिल्ली – अंदमान-निकोबार बेट मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली आहे. मध्यरात्री १ वाजून ५९ मिनिटाला भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या सुत्रांनी दिली. भूकंपाच्या धक्क्यामुळे अद्यापपर्यंत कोणत्याही स्वरूपाच्या हानीचे वृत्त समोर आलेले नाही. गेल्या आठवड्यात जपानमधील ओसाका शहराला शक्तिशाली भूकपांचे हादरे बसले होते. या घटनेत काही जणांना जीव गमवावा लागला होता तर दोनशेहून आधिक लोक जखमी झाले होते.