अंदाजपत्रकाची होळी हा लोकशाहीला काळीमा – मुख्यमंत्री

0

मुंबई : राज्य सरकराने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा निषेध करत अंदाजपत्रकाची कागदपत्रे जाळण्याचे विरोधकांचे कृत्य लोकशाहीला काळिमा फासणारे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केले.

राज्याचा अर्थसंकल्प हा प्रगतीशील अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  हा कृषी विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे, कृषी क्षेत्राला गुंतवणुकीकडे नेण्याचे दृष्य परीणाम पहायला मिळत आहे, महाराष्ट्राच्या इतीहासात इतका चागला ग्रोथ रेट पहायला मिळालेला नाही असे मत व्यक्त करुन शेततळी, ड्रीप इरीगेशन, हवामान आघारीत विमा योजना या योजनांसह  कृषीला शाश्वततेकडे नेणारा अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.

त्याच बरोबर युवा, महीला,सामाजीक न्यायाची भुमीका घेउन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला गेल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी सांगीतले. गेल्या वर्षात 2 लाख पेक्षा जास्त घरांची निर्मीती सुरु केलेली आहे, 20 वर्षात जेवढी शौचालये तयार झाली नाहीत तेवढी 2 वर्षात तयार झालेली आहेत हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी उद्योग क्षेत्रात सर्वाधीत गुंतवणुकीला चालना देणारे राज्य महाराष्ट्र असल्याचे सांगीतले….शेतकर्यांना कर्जमाफी देताना  30 हजार 500 कोटी रुपयाची गुंतवणुक जर कर्जापोटी केली तर शेतीच्या इतर योजनांसाठी शासनाकडे निधी उरणार नाही आणि राज्याची वाढ अडचणीत येईल तसेच जे शेतकरी नियमीत कर्ज भरतायत त्यांच्यासाठी कुठल्याही योजना करताना  अडचणी निर्माण होतील अशी प्रतिक्रीयाही मुख्यमंत्र्यांनी  दिली.

ज्या प्रकारचे विरोधकांचे वागणे होते ते लोकशाहीला साजेसे नव्हते पण शेतकऱ्यांची थट्टा करणारे होते, वेल मधे हास्य विनोद आणि थट्टा मस्करी सुरु होती, जी बजेटचे कागदे जाळण्यात आली ती लाजीरवाणी गोष्ट आहे, विरोधक अत्यंत फ्रस्टेटड आहेत, प्रत्येक निवडणुकीत ते मार खात आहेत, या समस्या त्यांनीच उभ्या केल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी करतोय ते तरी गंभीरतेने करा..

शिवसेना आणि भाजपा चे आमदार एकत्रीतपणे केंद्रसरकार कडे गेलो, केंद्रसरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला, पण असा निर्णय एका दिवसात होत नाही, राज्य सरकार जर असा निर्णय घेत असेल तर राज्यसरकारला साथ दीली पाहीजे, मी उध्दव ठाकरे यांच्याशी बोललो, शिवसेनेने समर्थन दिलेले आहे असेही श्री फडणवीस म्हणाले. विरोधकांच्या वागण्याबद्दल नियमाने कारवाई होईल अशा शब्दात आजचे विरोधकांचे वागणे आपण गांभिर्याने घेतले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.

अर्थसंकल्पाआधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा असा आग्रह विरोधकांनी धरला होता व त्यासाठी गेले दोन आठवडे विधिमंडळाचे कामकाज रोखून धरले होते. त्यात शिवसेनाही सहभागी होत होती. मात्र, शिवसेनेने आज त्या मागणीमधून अंग काढून घेतले. दिल्लीत राज्य सरकारने काल जे प्रयत्न केले त्याने समाधान झाल्याचे सेना नेत्यांनी सांगितले व सभागृहात विरोध करण्याचे सेनेने सोडून दिले. त्यामुळे सहाजिकच विरोधकांची शक्ती सभागृहात उणावलेली दिसली.

ते एकीकडे घोषणा देत उभे असतानाच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अंदाजपत्रक सादरही केले. नंतर विधिमंडळाच्या आवारात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे जीतेंद्र आव्हाड, काँग्रेसचे अनंत गाडगीळ आदिंनी अर्थसंकल्पाचे भाषण पेटवून निषेध केला. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची ‘पारदर्शक’ फसवणूक झाली असून, कर्जमाफी ऐवजी केवळ आश्वासनांची ‘गाजरे’ मिळाल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.