जळगाव। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जवाब दो’ हे मूक आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पुढील महिन्यातील 20 ऑगस्टला 4 वर्षे होत आहेत. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे, एस.एम.कलबुर्गी यांची हत्या झाली. मात्र मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. शासनासह तपास यंत्रणा तपासाबाबत गंभीर नाही म्हणून हे मूक आंदोलन करण्यात आले.
सरकारी तपास यंत्रणेने संशयित आरोपी निष्पन्न केले. मात्र हे संशयित अद्यापही फरार आहेत. फरार संशयिताना अटक करण्यात तपासी यंत्रणा का अपयशी ठरल्यात ?, अद्यापही आरोपी फरार का ? त्यांना अटक न करू शक्ण्यामागे काय कारणे आहेत ? याची उत्तरे या आंदोलनातुन अंनिसने मागितली.
यांची होती उपस्थिती
राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अमृत महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस.कट्यारे, जिल्हा प्रधान सचिव राजेंद्र चौधरी, अशोक तायडे, आड. भरत गुजर, शहर कार्याध्यक्ष हेमंत सोनावणे, सचिव पियुष तोडकर, अरुण दामोदर, अश्फाक पिंजारी, काळू कोळी, राहुल खरात, अतुल चित्ते, आशुतोष वानखेडे, आड. एस.एस.पाटील, प्रा. विश्वजीत चौधरी, मुकुंद सपकाळे, शिरीष चौधरी आदि उपस्थित होते. आंदोलनस्थळी आ.सुरेश भोळे यांनी चर्चा केली. प्रा. कट्यारे यांनी आमदारांकडे नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांकडे आपल्या भावना पोहोचवतो, असे आश्वासन आ. सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.