अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

0

शहादा। महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजीत संभुअण्णा पाटील स्मृती तालुकास्तरीय वकृत्त्व स्पर्धेत कै.जी.एफ. पाटील कनिष्ट महाविद्यालयाच्या 12 वी विज्ञान शाखेच्या नुपुर पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. शेठ व्ही. के. शाह विद्यालयात झालेल्या या स्पर्धेत शहादा तालुक्यातील एकूण पंधरा शाळांनी सहभाग घेतला होता. द्वितीय क्र. सय्यद उजमा अशपाक अली (निषाद हायस्कूल शहादा), तृतीय क्र. नेहा अशोक पाटील(कै.जी.एफ. पाटील कनिष्ट महाविद्याल) तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे -प्राची धनसिंग गिरासे, गायत्री नरेंद्र गिरासे, नेहा अश्पाक अली सय्यद यांची निवड करण्यात आली.

स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्रे व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण डॉ.विवेक पटेल, डॉ.मेघना पटेल,डॉ. सचिन चौधरी. डॉ.दीपा चौधरी. डॉ.अभिजीत पाटील.डॉ.सोनाली पाटील. यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संभुअण्णा यांचे कुटुंबीय परशराम सदाशिव पाटील, सुनील संभू पाटील,विद्या सुनील पाटील,कल्पेश बिपिन पाटील, प्रभावती बिपिन पाटील, वारूला प्रशांत पाटील उपस्थित होते. याप्रसंगी शहरातील अंनिस चळवळीचे मार्गदर्शक हैदर नुरानी,डॉ.शशांक कुलकर्णी, शाखा उपाध्यक्ष विनायक पवार राष्ट्र सेवा दलाचे शहर कार्यध्यक्ष मानकभाई पाटील, जिल्हा संघटक मोहन पाटील, जेष्ठ नागरिक संघाचे अ‍ॅड .गोविंदभाई पाटील, पूना केशव पाटील शेठ, व्ही.के.शहा विद्यालयाचे प्राचार्य छोटूलाल विठ्ठल चौधरी, जायन्ट्स ग्रुपच्या पुष्पा दुरंगी, अंनिस राज्य सरचिटनिस विनायक सावळे, शाखाकार्यध्यक्ष रविंद्र पाटील, प्रधान सचिव संतोष महाजन, अंनिस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपसस्थित होते. परीक्षणाचे काम प्रा.सविता पाटील, अ‍ॅड, सरजु पाटील, चुनीलाल ब्राह्मने व प्रा. आरती सरोदे यांनी पहिले. सूत्रसंचालन भूमी शहा यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अंनिस जिल्हा महिला विभाग प्रमुख भारती पवार यांनी करून दिले. तर आभार अंनिस शहादा शाखेच्या उपाध्यक्ष संगीता पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी शेठ.व्ही.के.शहा विद्यालयाचे सर्व कर्मचारी व अंनिस कार्यकर्ते यांनी कामकाज पाहिले.