अंधश्रध्दा निर्मुलन समिती राबविणार व्यसन विरोधी पंधरवाडा

0

भुसावळ : देशात 31 डिसेंबरला नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसन करतांना दिसून येते. यादिवशी व्यसनाचा पहिला अनुभव घेवून पुढे व्यसनाधिन होतात. या पार्श्‍वभूमिवर अंनिसतर्फे ‘चला व्यसनाला बदनाम करुया’ ही व्यसनविरोधी मोहिम राबविण्यात येत आहे.

राज्यभरात 31 डिसेंबर दरम्यान व्यसनविरोधी युवा निर्धार मेळावा घेण्यात येवून व्यसनमुक्त व्यक्तिच्या हस्ते दारुच्या बाटलीला जोडे मारुन उद्घाटन केले जाणार आहे. या मेळाव्यात तरुणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच 31 डिसेंबर ‘दारु नको दूध प्या’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार आहे. यामध्ये नागरिकांना दारुचे दुष्परिणाम सांगून दारुऐवजी शरिराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन केले जाईल. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अरुण दामोदर, सागर बहिरुणे, चंद्रकांत चौधरी, प्रा. निलेश गुरचळ, शामकुमार वासनिक, शशिकांत रायमळे, भगवान निरभवणे, प्रा. सोपान बोराटे यांनी केले आहे.