भुसावळ। आंधळ्या लोकांना मॅसेजद्वारे संभाषण करता यावे यासाठी संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प पुर्णत्वास आणला आहे. तंत्रज्ञानाच्या युगा मोबाईल ही एक गरज बनली आहे. जगात एकुण 80 टक्के लोक मोबाईलचा वापर करून मॅसेजद्वारा संवाद साधतात. हाच संवाद आंधळ्या लोकांनासुद्धा स्वतंत्रपणे साधता यावा म्हणुन गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनी नम्रता फालक, मयुरी कुलकर्णी, पुनम लोखंडे, कविता बर्हाटे, तृप्ती चौधरी यांनी ‘अॅडव्हान्स एसएमएस ट्रान्समिशन अॅड रेसिपशन सिस्टिम फॉर ब्लाइंड पिपल’ हा प्रकल्प तयार केला आहे. हाच या प्रकल्पामागचा उद्देश्य आहे.
कमी खर्चात प्रकल्प
या आधी नोकिया आणि इंटेल कंपनीने सुद्धा हा प्रकल्प बाजारात आणला होता परंतु त्याची किंमत बघता हा प्रकल्प स्वस्त तसेच फायदेशीर आहे. आत्तापर्यंत ब्रेल लिपी ही फक्त आंधळ्यांना वाचनासाठी उपयुक्त होती, परंतु या प्रकल्पाद्वारे या लिपीचा उपयोग हा एसएमएससाठी सुद्धा शक्य आहे. हा प्रकल्प प्रा. गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्णत्वास आणला आहे. भविष्यात या प्रकल्पात काही बदल करुन याचा उपयोग आंधळ्या लोकांना वाचनासाठी होईल.