अंधेरीत मैत्रीणीला मॅसेज पाठविणार्‍याला तरुणावर हल्ला

0

मुंबई – मैत्रिणीला मॅसेज पाठविणार्‍या तरुणाला त्याच्याच मित्राने बेदम मारहाण केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. जखमी झालेल्याा उमान नौशाद शेख या तरुणाला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी आरोपी मित्र मैफुज मकसूद शेख याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उमान आणि मैफुज हे दोघेही अंधेरीतील जुहू गल्लीत राहत असून ते दोघेही चांगले मित्र आहेत. या दोघांची एक कॉमन मैत्रिण आहे. काही दिवसांपूर्वी मैफुजने या तरुणीला एक मॅसेज पाठविला होता. ही माहिती उमान याला समजताच त्याने मैफुजला भेटून तिच्या मैत्रिणीला मॅसेज का पाठविला म्हणून जाब विचारला होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून त्याने उमानला बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला त्याच्या भावाने कूपर रुग्णालयात दाखल केले, रुग्णालयातून ही माहिती मिळताच डी. एन. नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी उमानच्या जबानीवरुन पोलिसांनी मैफुज शेखविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. उमानवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले.