अंधेरीत शून्य कचरा निर्मितीचे भव्य प्रदर्शन

0

मुंबई । मुंबईत दिवसेंदिवस वाढणार्‍या कचर्‍याच्या विल्हेवाटीवरून पालिका प्रशासनामध्ये वादाची ठिणगी पडत असताना शून्य कचरा निर्मिती कशी करावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारे भव्य प्रदर्शन रविवारी अंधेरी येथील पालिकेच्या के पूर्व विभागात सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आले होते. मुंबई, पुणे, नाशिक, बंगळुरू आदी शहरांमधील या क्षेत्रात काम करणार्‍या 45 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात गृहसंकुल, हॉटेल, मोठा कचरा निर्माण करणार्‍या कंपन्या यांच्यामार्फत निर्माण होणार्‍या कचर्‍याचे नियोजन करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, मशिनरी, पद्धती याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

के पूर्व विभागातील रहिवाशांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्याप्रमाणे ओला आणि सुक्या कचर्‍याचे योग्य विल्हेवाट लावणे. कचर्‍यापासून आणि बायोगॅसमुळे होणारे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेन्य कचरा प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
– दिनेश हेलिया, मुख्य सहायक पर्यवेक्षक.

कचर्‍यापासून मिथेनची निर्मिती
कचरा साठत गेल्यानंतर त्या खाली मिथेन वायुची निर्मिती होते. त्यातून मिळणार्‍या बायोगॅसचा वापर 24 तास कसा करता येतो आदी बाबींविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आल्याचे अभियंता तुषार पिंपळे यांनी सांगितले. या प्रदर्शनाचे उद्घाटन परिमंडळ 3 चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर,सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन, घनकचरा अभियंता तुषार पिंपळे आणि मुख्य सहायक पर्ववेशक दिनेश हेलिया यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.