चिंचवड – अंध अपंग विकास असोसिएशन संस्थेच्या वतीने शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. ध्वजारोहण भाग्यश्री साने यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष दिनकर गायकवाड, चंद्रकांत सहाणे, फाजल शेख, प्रदीप गायकवाड, सुनील गावडे, प्रतीक लोंढे, दशरथ डोके, विजय गिरमे, नरेंद्र निकाळजे, निलेश कदम, अरविंद दरवडे, रशीद सय्यद, प्रियंका रावळ, चिंतामणी कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी अंध, अपंग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत कान्हेरे यांनी केले. तर प्रदीप गायकवाड यांनी आभार मानले.