अंध बांधवांनी स्वयंरोजगाराच्या वाटा निवडल्यास आयुष्य उजळून निघेल

0

जळगाव। अनेक अंध बांधवांच्या नशिबी भिक मागणे तसेच उपेक्षेचे जीवन जगणे येते. मात्र त्यांनी स्वयंरोजगाराच्या वाट निवडल्या त्तर त्यांचे आयुष्य उजळून निघेल, असे प्रतीपादन महाबळेश्वर येथील सनराईज कंडलचे संस्थापक संचालक भावेश भाटीया यांनी केले. खानदेशातील अंध विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मू.जे.महाविद्यालयाने सनराईज कंडलशी सामंजस्य करार केलेला आहे. त्यांतर्गत महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांच्यासह ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे, नीता भाटीया उपस्थित होते.कार्यक्रमात भावेश भाटीया यांनी त्यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. अंध असूनही त्यांनी कुठलेही शासकीय, अशासकीय अनुदान न घेता मेणावर आधारित मोठा स्वयंरोजगार अंध व्यक्तींकरिता उपलब्ध केला आहे. एक हजाराच्यावर मेणाचे प्रकार बनवून सनराईज कंडलचे अंध कर्मचारी स्वताच्या पायावर उभे राहून स्वावलंबी झाल्याची माहिती भावेश भाटीयांनी दिली. यावेळी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी, व्यक्तीला जेव्हा अंधत्व येते, तेव्हा तो खचतो. तेव्हा खचून न जाता अंध बांधवानी स्वयंरोजगारासाठी मला अथवा प्राचार्य काटे यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.