अंध शाळेचे विद्यार्थ्यांचे जीवनात पुन्हा अंधार

0

बिल थकबाकी मुळे चाळीसगाव राष्ट्रीय अंध शाळेचे वीज कनेक्शन कट
चाळीसगाव – येथील राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे नावाजलेल्या राष्ट्रीय अंध शाळे चे वीज कनेक्शन जुलै महिन्या पासून बाकी होते यासाठी अनेकदा तगादा लावून देखील बिल न भरल्याने आज अतिरिक्त कार्यकारी अभियं ता पथकाने सायंकाळी हा वीज पुरवठा खंडित केल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना आणखीन अंधारात राहण्याचे नशिबी आले आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय शिक्षण संस्थेबाबत पालकांमध्ये चीड निर्माण होण्याची वेळ आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शहराच्या भडगाव रोड स्थित जिल्ह्यामधील नावाजलेली एकमेव अंध शाळा आहे शेकडो अंध विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आज येथील विज पुरवठा खंडित करण्यात आला आहे . सुमारे सत्तर हजार रुपये पेक्षा अधिक विज बिल जुलै महिन्या पासून थकीत असल्याने आम्ही आज हे विज कनेक्शन बंद केल्याचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता डी पी महाजन यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले तर मुख्याध्यापक प्रभा मेश्राम या बाहेरगावी असून शाळेचे विज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे शाळेचे अधीक्षक राजूवले जमादार यांनी सांगितले आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारचे अनुदान देत असताना नेमक्या अंध विद्यार्थ्यांना अंधारात राहण्याची नामुष्की ओढवली असल्याने शिक्षण क्षेत्रात नाव लौकीक प्राप्त शाळेचे या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.