अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन

0

पुणे । डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही अद्याप त्यांच्या खूनाचा छडा लागले नाही. याच्या निषेधार्थ रविवारी (20 ऑगस्ट) रोजी सकाळी 7 वाजल्यापासून जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पथनाट्य, पोवाडा, विविध गीतांमधून दाभोळकरांना अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे राज्य सरचिटणीस हमिद दाभोलकर यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनिंसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी आदी उपस्थित होते.

सकाळी 7.30 वाजता विठ्ठल रामजी शिंदे या पुलावरून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी अमोल पालेकर आणि डॉ. शैला दाभोळकर उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाचा समारोप पर्वती पायथा येथील साने गुरुजी स्मारकाजवळ होणार आहे. यावेळी निषेध सभा होणार आहे. अंनिसच्या वतीने सोशल मिडियावर जबाब दो हे कॅम्पेन चालविण्यात येत असल्याची माहिती मिलिंद देशमुख यांनी दिली. सर्व भाषांमध्ये या कॅम्पेनच्या इमेजेस आहेत. 30 ऑगस्टपर्यंत ते सुरू राहणार आहे.