नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन, जिल्हाधिकार्यांना निवदेन
नंदूरबार- महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जवाब दो आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकार्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. .डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात अटक असलेल्या सचिन अंदुरे संबंधी तपास खोलवर व्हावा तसेच या मागे असणार्या संस्था-संघटनावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यांचा होता सहभाग
जिल्हाधिकारी कार्यालयावरील जवाब डॉ आंदोलनात राज्य सरचिटणीस विनायक सावळे,माजी जिल्हाध्यक्ष डॉ शशांक कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ डी बी शेंडे,प्रा.ए.बी.महाजन,संभू पाटील,जिल्हा प्रधान सचिव खंडू घोडे,हंसराज महाले,जनार्थ आदिवासी विकास संस्थेचे रंजना कान्हेरे,विक्रम कान्हेरे, भारिपचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे,शहादा शाखेच्या उपाध्यक्ष संगीता पाटील,हैदर नुरानी,कार्याध्यक्ष रविंद्र पाटील,तळोद्याचे उपाध्यक्ष मंगलसिंग पाटील,कार्याध्यक्ष मुकेश कापुरे,सचिव अमोल पाटोळे,महिला विभागाच्या भारती पवार,नितिन महाले,प्रा.मुरलीधर उदावंत,श्रीकांत पाठक,भारती पवार,प्रविण वाघ,राजेंद्र निकुंभे, प्रा.आर व्ही कर्पे, तात्याजी पवार,भटू सामुद्रे,जेष्ठ नागरिक संघचे बारकू पाटील,आदींसह जिह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप
या आंदोलना दरम्यान उपस्थित असणार्या मान्यवरांनी डॉ दाभोळकर व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीबाबत मनोगत व्यक्त केलीत.त्यानंतर जिल्हाधिकार्यांना डॉ नरेंद्र दाभोलकर व कॉ गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासातील अक्षम्य दिरंगाई व कारवाईच्या मागणी बाबतचे निवेदन देण्यात आले.डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात अटक असलेल्या सचिन अंदुरे संबंधी तपास खोलवर व्हावा तसेच या मागे असणार्या संस्था-संघटनावर कारवाई व्हावी, विध्वंस घडविणार्या तसेच भारतीय लोकशाहीला धोका असणार्या संस्था-संघटनाच्या बाबतीत मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा केंद्र शासनाकडे प्रस्तावाचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाने करावी व कार्यवाही करावी,डॉ दाभोलकर, कॉ पानसरे, कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास करणार्या चारही तपास यंत्रणांमध्ये समन्वय असावा,अश्या मागण्या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत.
कार्यकारिणीची बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयावरील जवाब दो आंदोलनानंतर दुपारच्या सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. बैठकीत संघटनात्मक कामकाजावर चर्चा करण्यात आली व पुढील उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. बैठकीच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक प्रा पितांबर सरोदे होते. बैठकीचे व जवाब दो आंदोलनाचे संयोजन नंदुरबार शाखेचे कार्याध्यक्ष फिरोज खान,सचिव किर्तीवर्धन तायडे,चंद्रमानी बर्डे,सूर्यकांत आगळे,दिलीप बैसाने,दीपक चौधरी, आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.