अंनिसच्या घोटाळ्यातून उलगडणार खुनाचे रहस्य

0

मुंबई । आतापर्यंत अंनिसच्या भ्रष्टाचाराविषयी समोर आलेल्या घटना म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. डॉ. दाभोलकर यांनी न्यासाची चौकशी करू देण्यास हरकत नसल्याने म्हटले होते. असे असतांना अन्य विश्वस्त चौकशीविषयी टाळाटाळ का करत आहेत? यामागील गौडबंगाल नेमके काय आहे? डॉ. दाभोलकर आणि अन्य विश्वस्त यांच्यातील मतभेदाचे नेमके कारण काय? दाभोलकर यांनी जबाब दिल्यानंतरच त्यांची हत्या झाली, हा महत्वाचा भाग का तपासला जात नाही?

या चौकशीतूनच डॉ. दाभोलकर यांचे खरे मारेकरी सापडतील, असे मत हिंदुपरिषदेचे राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी व्यक्त केले. 20 ऑगस्ट 2017 रोजी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने दादर (पश्चिम) येथील कबूतरखाना या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात श्री शिवकार्य प्रतिष्ठान, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, हिंदु राष्ट्र सेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता जागृत समिती, सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर ‘डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत’, अशी ओरड करत अंनिस ‘जवाब दो’ चा गोंधळ घालत आहे. प्रत्यक्षात मात्र अंनिसचेच आर्थिक व्यवहार गोंधळात टाकणारे आहेत.