अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा.कट्यारे

0

जळगाव । महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा.डी.एस.कट्यारे यांची पुनर्निवड करण्यात आली असून प्रधान सचिव म्हणून रविंद्र चौधरी, पाचोरा यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदी युरॉलॉजिस्ट डॉ.अनिल पाटील तर उपाध्यक्षपदी बी.एन.पाटील आणि डॉ. मंगला साबद्रा यांची निवड झाली. जिल्हा सरचिटणीस विलास रायमाळे, यावल आणि अमित कुमावत, चाळीसगाव, कायदेविषयक सल्लागार ऍड.भरत गुजर, विविध उपक्रम सुनील वाघमोडे, अमळनेर, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प रियाज शेख, जळगाव, बुवाबाजी संघर्ष अरूण दामोदर, भुसावळ, वार्तापत्र विभाग आर.एस.चौधरी, जळगाव, सांस्कृतिक अभिव्यक्ती डॉ.अयुब पिंजारी, चोपडा, युवा सहभाग खुशाल जाधव, चाळीसगाव, महिला विभाग दर्शना अरुण, चाळीसगाव, प्रशिक्षण विभाग चंद्रकांत जगदाळे, पारोळा, सोशल मिडीया व्यवस्थापन विश्‍वजीत चौधरी, मानसमित्र व व्यसनमुक्ती दीपक लांबोळे, चाळीसगाव यांची लोकशाही पध्दतीने कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.