अंनिसच्या शहर शाखेची नूतन कार्यकारिणी गठीत

0

भुसावळ  । अंधश्रध्दा निर्मूलन समितीची बैठक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डिगंबर कट्यारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी समिती शहर अध्यक्षपदी अंजना निरभवणे, तालुकाध्यक्षपदी शामकुमार वासनिक व सागर बहिरुणे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच प्रकाशन वितरण प्रा.डॉ. सोपान बोराटे, उपाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रा. निलेश गुरचळ, संघटना बांधणी सचिव शशिकांत इंगळे, सहसचिव शशिकांत झांबरे, शिबीर कार्यवाहक रणजित राजपूत, निधी तपासणी कार्यवाह मनोज नंदागवळी, प्रसिध्दीप्रमुख भगवान निरभवणे, सल्लागार पी.के. सपकाळे, कार्यवाह निलेश भदाणे, अरुण दामोदर, कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. मतिन अहमद, सदस्य चंद्रमणी सपकाळे, जी.डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.